बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, ‘या’ अभिनेत्रीनं मुलीला दिला होता सल्ला

मुंबई | वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी मुलीच्या म्हणजेच मसाबाच्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.

मसाबानं अभिनेत्री होऊ नये, असं नीना यांना कायम वाटत होतं. एका मुलाखतीत बोलत असताना नीना यांनी सांगितलं की, मी मसाबाला आधीच सांगितलं होतं जर तुला अभिनेत्री व्हायचं असेल तर तू विदेशात जा. ज्या पद्धतीची तुझी शरीररचना किंवा चेहरा आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही, तू कधीच हेमा मालिनी किंवा आलिया भट्ट नाही होऊ शकत.

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच’ मसाबा मसाबा’ या सीरिजच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. नीना गुप्ता यांना मसाबाने बॉलिवूडमध्ये काम करु नये, असं वाटत असतानाच दुसरीकडे मात्र, मसाबाच्या पहिल्याच सीरिजचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.

दरम्यान, एकदा फ्लाइटमध्ये नीना गुप्ता यांची भेट अभिनेता शाहरुख खान आणि करण जोहरशी झाली होती. त्यावेळी त्यांनी मला त्यांचा नंबर दिला होता. पण मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी उचलला नाही. खूप मतलबी लोकं आहेत ते, असंही नीना म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या – 

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 6 जुलैपासून शिक्षण संस्था चालू होणार; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

खासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

“गोपीचंद पडळकर बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More