Top News

“सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते”

पुणे | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळं शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही. उलट सरकारवर काहीजण टीका करण्याचे काम करीत आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचं आवाहन करण्याऐवजी ज्या विरोधकांनी राज्यातील नेत्यांना, व्यवसायिकांना आणि नागरिकांना पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केलं, अशा महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा कठोर शब्दांत वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत- अक्षय कुमार

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ- आशिष शेलार

घराणेशाहीबाबत सैफ अली खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या