“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”
मुंबई। 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले असता शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देत त्यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Keskar) यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही उलट उत्तर देणार नाहीत. आमच्याकडे कायदेशीर लढाई असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे.
आमचं कुटुंब एकत्र आहे. आम्ही सर्व एक आहोत, असं दीपक केसरकर म्हणाले. तर आमचा कुटुंबप्रमुख यामध्ये नाही. जर ते आमच्यात आले तर आम्हाला खूप आनंद होईल, असं देखील दीपक केसरकर म्हणाले आहेत. तर शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटविल्याचे पत्र हे बेकायदेशीर आहे, आणि त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असंही केसरकर म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जाता आहे. शिंदे यांची शिवसेनेच्या गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेने याबाबतचं पत्र देखील काढलं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर
‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका
“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”
शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.