बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणं अयोग्य”

मुंबई |  पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना चुकीची असल्याचं सांगत हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता, असा टोला काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीच अर्थव्यवस्था प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केलीय. त्यानुसार भारताच्या जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट दिसून आली आहे.

गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. काही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते 100 टक्के बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमहाबादेतील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली होती. स्वतंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचं नाव दिलं होतं, असं आव्हाड म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाही”

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण…- संभाजीराजे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More