बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत आणि तालिबान एकाच मंचावर; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

नवी दिल्ली | अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारतासंदर्भात तालिबान्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तालिबान भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणार असल्याचं तालिबानने सांगितलं आहे. तसेच भारतविरोधात दहशतवाद्यांसाठी जमीन वापरू न देण्याचंही तालिबानने कबूल केलं आहे. अशातच आता भारत तालिबानसंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

20 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मॉस्को मसुद्याच्या बैठकीसाठी तालिबानच्या प्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात येईल. भारतही या बैठकीत सहभागी होणार आहे. ही बैठक रशियाने आयोजित केली आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या बैठकीत रशियासोबत तालिबान, भारत, चीन, पाकिस्तान आणि इराण हे देश सुद्धा मॉस्को चर्चेत सहभागी होणार आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर मॉस्को या ठिकाणी ही पहिलीच बैठक होणार आहे.

अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायाबद्दल मॉस्को चिंतित आहे. अफगाणिस्तानमधील वाढत्या दहशतवादाच्या वाढत्या धोक्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मॉस्को येथील बैठकीनंतर रशिया ट्रोइका प्लस बैठक घेण्याची शक्यता आहे. यासाठी रशियासह अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या देशांना आमंत्रित करणार असल्याचं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, अलिकडेच भारत-रशिया या दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय यंत्रणा बैठक पार पडली. या बैठकीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांंनी देखील अफगाणिस्तानमधील समस्याबाबत मुद्या उपस्थित केला होता. यावेळी दोन्ही देशांनी सुरक्षा संदर्भात सैन्यामधील सहकार्य आणि गुप्तचर संस्था वाढवण्यावर भर दिला होता.

थोडक्यात बातम्या- 

“मला शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतील असा भाजपचा समज झालाय”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ‘राष्ट्रीय नेतृत्व’ करण्याची क्षमता”

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी होणार

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More