देश

लोकसभेतील हे माझं अखेरचं भाषण असेल- माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा

नवी दिल्ली | गेल्या 57 वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे, पण लोकसभेतील हे माझं अखेरचं भाषण असेल, असं माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांनी म्हटलं आहे. ते लोकसभेत बोलत होते.

1996 मध्ये मी पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक नव्हतो पण व्ही.पी.सिंग आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बासू यांनी नकार दिल्यानं ते पद मला मिळालं, असं देवगौडा यांनी म्हटलं आहे.

एकमेकांना समजून घेतल्यास महाआघाडी यशस्वी होऊ शकते, महाआघाडीतील पक्षांनी एकमेकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, जेडीएसचे नेते असलेल्या एच.डी.देवगौडा यांच्या या वक्तव्यामुळं त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिल्याचं स्पष्ट होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!

विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!

-…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या