मुंबई | आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडून संक्रांतीपासून वर्गणीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच मुद्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनी भाजपवर टीका केली. याच मुद्यावरुन ‘ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच असल्याचं म्हणत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार?, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होतं, असं म्हणत अप्रत्यक्षपणे भातखळकरांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, राऊत यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”
भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली
मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे
…तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेवटचं आंदोलन करेल- अण्णा हजारे