बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये डर होना जरूरी है’, चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना खोचक टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडी कारवाईची भीती व्यक्त केली होती. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

आज 38 वर्षे होत आले मी राजकारणामध्ये आहे. माझ्या पोरीचा राजकारणाशी काय संबंध आहे?, असा प्रश्न करत जितेंद्र आव्हाड यांनी मुलगी अनेक ठिकाणी डायरेक्टर असल्याचं सांगितलं होतं. आपल्या मुलीची चिंता जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली होती. जे चाललयं ते उघड्या डोळ्यांनी बघायचं, आपली बायका मुलं अडकणार नाहीत याची काळजी घ्यायची असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं.

कुटूंबाला बाहेर कुठंतरी पाठवून द्यायचं, असे दिवस महाराष्ट्रावर आले आहेत. चौकशीला बोलावलं तरी माझी मुलगी आत्महत्या करेल. मी काही चुका वगैरे केल्या नाहीत. पण काय सांगता येत नाही. वरच्या टेपिंग बिपिंगमध्ये चुका असतील तर काही करता येणार नाही. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल, अशी अनेकांना भीती आहे. या भीतीने अनेकजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागले आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है,  ये डर होना जरूरी है, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ईडीच्या सततच्या कारवाईवर संजय राऊत म्हणतात…”मला तर भिती वाटतेय”

“दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही”

मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय

‘मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले’; आठवलेंनी दिली संसदेत माहिती

टाटाच्या ‘या’ शेअरची कमाल; गुंतवणूकदार मालामाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More