बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

बारामती | कोरोनामुळे लाॅकडाऊन पडल्यानं अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आता रुग्णसंख्येत घट होत असल्यानं अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आलेत. अशातच बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे.

बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्याबाबतचे निर्णय प्रशासनानं घ्यावेत, असे निर्देशही यावेळी अजित पवार यांनी दिले.

दरम्यान, पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, असं आवाहन अजित पवार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More