बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

अहमदनगर | महाराष्ट्राला सहकाराचा समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचं योगदान कोणालाही कधीही नाकारता येत नाही. पण सहकारातून समृद्धी करत असताना राजकारणाच्या वाटा समृद्ध झाल्या हे कळालंच नाही. देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

अहमदनगर येथील प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद भरवण्यात आली आहे. खासदार सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं शेतकरी मेळाव्याला अमित शहांनी संबोधित केलं. अमित शहांनी राज्यातील सहकार चळवळीवर भाष्य करताना सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

सहकार चळवळ मागं का पडली याचा अभ्यास करायला हवा. सहकारात भ्रष्टाचार कसा झाला याचा विचार केला पाहीजे, असं अमित शहा म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सहकारी बॅंका कुठं गेल्या?, त्यांच्यात भ्रष्टाचार कुणी केला?, या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला हवा, असंही अमित शहा म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रवरानगरमध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला होता. परिणामी या सहकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. अमित शहांनी आपल्या भाषणादरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या भविष्यातील सहकाराच्या वाटचालीवर भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, अशा गर्वात राहू नये”

‘छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट आणि…’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

धक्कादायक! बूस्टर डोस घेऊनही Omicronची लागण

‘संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण…’; गडकरी म्हणतात…

उठ मराठ्या उठ! महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More