बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…

पुणे | बंडखोर आमदार कांदे यांनी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. यावर भाष्य करत भाजप नेते नितीश राणे यांनी ट्विट करत नारायण राणेंनाही मारण्याची सुपारी शिवसेनेनं दिली होती, असा आरोप केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डाॅ श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रथांचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते झालं. ते पुण्यात बोलत होते.

नितेश राणेंच्या ट्विटबद्दल विचारल्यावर शरद पवार म्हणाले त्या मुलाबाळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असं म्हणत नितेश राणेंसोबत नारायण राणेंनाही शरद पवारांनी टोला लगावल्याचं दिसत आहे. राज्यात कोणाला सुरक्षा द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचा मुख्य सचिव आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते. माजी गृहमत्र्यांची भेट मी घेतली होती याबद्दल त्यांनी मला सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती, त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, असंही ते म्हणालेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही एकनाथ शिेंदेंना छातीवर दगड ठेवून मुख्यंत्रीपद दिलं आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर त्यांनी छातीवर दगड ठेवाव नाहीतर डोक्यावर ठेवावा आम्हाला त्याच्यांशी घेणं देण नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अस शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राज्यातील सत्ता दोघांनी चालवायचं ठरवलं आहे. ते सत्ताधारी आहेत त्यामुळे ते काय करतील ते आपल्याला स्विकारावं लागेल. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचं वॉरंट

शिंदेंच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट!

“आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय”

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

कोरोना, डेंग्यूनंतर ‘या’ साथीचा धोका; अचानक रूग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More