बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही- प्रविण दरेकर

मुंबई | सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब काल कोसळला होता. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे.

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत सरकारवर सडकून टीका केलीये.

वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही दरेकरांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

उपराष्ट्रपती नायडुच नाही तर RSS नेत्यांचीही ब्लू टिक ट्विटरनं हटवली!

बहुचर्चित Hyundai Alcazar कारची प्रतिक्षा संपली; जाणून घ्या नव्या दमदार 7 सिटर गाडीचे फिचर्स

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती’

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मराठा मोर्चा निघणारच’, विनायक मेटे आक्रमक; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More