मुंबई | काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे? असा संतप्त सवाल शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला विचारला आहे.
काश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचा पक्ष सरळ आझाद काश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम काश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे, असं संजय राऊत म्हणालेत.
फारुख अब्दुल्ला यांनी तर भारताच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे, असंही राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा
“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”
“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”
“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”
“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”