कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाटलांच्या नेतृत्वाला पाठींबा देत राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
राजकारणात हार-जीत होत राहणारच. फक्त निवडणुकीचे निमित्त पुढे करून ज्यांना पक्षामध्ये कोणतेही फारसे महत्त्वाचे स्थान नाही. दोन चार फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व कमी होणार नाही, असं जाधव यांनी म्हटलं आहे.
भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही. राज्यातील अनेक बड्या नेत्यांन भाजपमध्ये प्रवेश केला. सतत राज्यात भाजप वाढीसाठी दादा प्रयत्न करत असल्याचं जाधव म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे या नेत्यांनी केली होती. यावर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी टोला लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवं जातं?’ उद्धव ठाकरे
…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत
मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे
आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे- देवेंद्र फडणवीस
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…