बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

नवी दिल्ली | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस 12 हजार किलोमीटरची यात्रा काढणार आहे. तर दुसरीकडे भाजपही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात काॅंग्रेसवर प्रखर शब्दात टीका केली आहे.

ब्रिटिशांनी भारताला लुटले, त्यानंतर काॅंग्रेसने देशाला लुटले. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता तर इंदिरा गांधी यांनी साधूंवर गोळीबार केला होता. तर सोनिया गांधी यांनी तर रामाचे अस्तित्वच नाकारले होते. भाजप हा आस्थेचा आदर करणारा पक्ष आहे तर काॅंग्रेसने देशाला आजार दिला आहे. तर काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

राज्यात जर इतर पक्षाचे सरकार असते तर या ठिकाणी राम मंदिर कधीच झालं नसतं. भाजपनेच राज्याचा विकास केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेला माफियाराज देखील भाजपने संपवलं आहे.  लवकरच या राज्यात भव्य राम मंदिर उभं राहणार, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक देशात खूप महत्त्वाची मानली जाते. ज्या पक्षाची उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आहे. त्याची सत्ता देशात कायम राहते,असा एक मानस राजकीय वर्तुळात राहिला आहे. त्यामुळे सगळेच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

एका दुचाकीवर डझनपेक्षा जास्त मुलांचा गोंधळ, पाहा व्हिडीओ

“बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करू”

“पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक”

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More