मुंबई | कृषी कायद्याला विरोध करत गेले 12 दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज भारत बंदची हाक दिली. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या आंदोलनाला पाठींबा दिला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संपात सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
गेले 12 दिवस थंडी, वाऱ्याची, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातील नाही तर जगातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं राऊत म्हणाले.
मी संपूर्ण देशातून माहिती घेत होतो. जिथे भाजपचं सरकार आहे तिथेही चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद मिळत आहे. कारण हा बंद राजकीय नाही तर भावनांना पाठिंबा देण्यासाठी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हा संप स्वच्छेने, स्वंयफूर्तीने ज्याच्या कष्टाचं अन्न आपण खात आहोत त्याच्यासाठी आहे. जगात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मोर्चे निघाले असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
“शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे पण… “
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच- राजेश टोपे
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संक
“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”