बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आज सकाळपासून चक्का जाम आंदोलन केलं आहे. अशातच भाजप आमदार अशिष शेलार यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे, असं अशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या मुलुंड चेकनाक्याजवळ आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सरकारने कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटाही दिला नाही. आयोगाची निर्मिती केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ, असं अशिष शेलारांनी स्पष्ट केलं आहे.

अशिष शेलार यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याच्या सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरही भाष्य केलं आहे. राज्य सरकार आणि विशेषत: ठाकरे सरकार यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं आहे, ते एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाचं मृत्यूपत्रच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे इम्पेरिकल डाटा देण्यासाठी 15 महिने का लागले? फडणवीस सरकारने काढलेला जीआर व्यपगत का केला? या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

दिल्लीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही, पण… – शरद पवार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More