मुंबई | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नकार दिला आहे. यावरुन राज्य सरकारवर सगळे निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा हा केवळ सरकारचा किंवा वकिलांचा लढा नसून, हा संपूर्ण समाजाचा लढा आहे. केंद्राच्या पातळीवर संसदेत काही निर्णय घेतले तर मराठा आरक्षणाला संविधानिक संरक्षण मिळू शकते. त्याऐवजी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर टीका करणे दुर्दैवाचे आहे. उलटपक्षी त्यांनीच पुढाकार घेऊन या प्रकरणी केंद्र सरकारला पुढाकार घेण्यास भाग पाडले पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
समाजातील काही घटक राजकीय किंवा अन्य हेतुंनी जाणीवपूर्वक सरकारवर टीका करीत असतात. या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घटनापीठासमोर आजच मराठा आरक्षणाचे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पुढील मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबीनेटमंत्री असले तरी”
कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करता येणार नाही; नियमावली जाहीर
अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही, माझा हक्काचा संगीतकार गेला- प्रविण तरडे
चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा- संजय राऊत