बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब- जितेंद्र आव्हाड

मुंबई | टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र याबाबत काही गैरसमज झाले असावेत, असं आव्हाडांनी म्हटलंय.

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही…- देवेंद्र फडणवीस

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का; 39 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

“कोणी कोणाचं ऐकायचं नाही, हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More