बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

नाशिक | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निफाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यांनी त्रिपुरा घटना, नक्षलवाद, कंगणा रनौत हिचं वक्तव्य, बाबसाहेब पुरंदरे अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. शिवाय त्यांनी मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही या भाजपच्या दाव्यावर प्रत्युत्तर देताना “मोदींविरोधात चेहरा नाही. असं म्हणता येणार  नाही”, असं सांगितल आहे.

शिवाय त्रिपुरा घटनेवर बोलताना ते म्हणाले, “त्रिपुरामध्ये घडलं म्हणून महाराष्ट्रात हे घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. या प्रवृत्तींनी किती महत्त्व द्यायचं हे लोकांनी ठरवायचं आहे. राज्य सरकार चांगलं काम करत असताना बंदचा निर्णय नैराश्यातून घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम एकेकाळी सत्तेत असेलेले लोक करतायेत. हे दुर्दैव आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

नक्षलवादाबद्दल बोलताना ते म्हणाले, “नक्षलवादाचा ट्रेंड महाराष्ट्रात वाढत आहे असं नाही. आदिवासींवर अन्याय झाला आणि त्यांनी आंदोलन केले की त्यांना नक्षलवादी ठरवता. यावर बॅलेन्स ठेवायला हवा. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सोशित लोकांना मुख्य प्रवाहात आणलं तर बदल घडेल.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगणाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले, “अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे मला वाटत नाही. अशी माणसं असतात समाजात.” अशी टिका त्यांनी केली. याशिवाय पवारांनी बाबासाहेब पुरंदेरच्या निधनावरही शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पुरंदरेंनी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“हे दु:ख शब्दांच्या पलीकडचे आहे”; बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

मोठी बातमी! राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन मात्र ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण

“असा शिवआराधक शोधुन सापडणार नाही!” बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांचा तीव्र शोक

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More