बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा काही नेम नाही”

अहमदाबाद | भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही. कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे ती जागा एनसीपी कार्यालय करतील आणि एनसीपी कार्यालय बाळासाहेबांचे स्मारक करतील, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते.

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले गृहमंत्री अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांना मोठा इशारा

स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन

2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!

संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…

“25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More