बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

मुंबई | ‘कल हो ना हो’ या चित्रपटात जिया कपूर या नावाने काम केलेल्या झनक शुक्लाला ओळखणं आता प्रचंड कठीण झालं आहे. आपल्या बाल वयात झनक शुक्लाने कल हो ना हो, करिश्मा का करिश्मा, सोन परी, हातीम अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र सर्वात जास्त ती प्रसिद्धीला आली ते ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिका मधून.

झनकने स्वतःला फक्त इंडस्ट्री पासून दूर नाही केलं तर तीचा लुकला देखील बदलला आहे. एकेकाळी स्लीम आणि सौंदर्याने लोकांना आकर्षीत करणारी झनक आता काहीशी हेल्दी झाली आहे.

 

झनक शुक्लाने तीच्या वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली. त्यानंतर ती आता एक आर्कीयोलाॅजिस्ट आहे आणि तीला इतिहासात प्रचंड आवड आहे.

न्यूझिलँड मधल्या एका म्यूझियममध्ये ती काम करायचं स्वप्न पाहते मात्र पैशांची कमी असल्यामुळे ती दुवधेत अडकली आहे, असं तीने चेष्टेत सांगितलं आहे.

झनकला तीच्या आई-वडीलांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या सांगण्यावरुन तीचा कल ज्या दिशेकडे आहे ती ते करु शकते. तीला खुप काही करायचं आहे.

झनकने शाहरुख खान सोबत ‘कल हो ना हो’ या चित्रपटात काम केलं असून तीच्या बालवयातच तीने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र आता ती लाईमलाईट पासून खूप दूर गेली आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक!! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

6,6,6,6,6,6…! युवराजचा रेकाॅर्ड ‘या’ खेळाडूने मोडला, पाहा व्हिडिओ

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More