मुंबई | मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणं चुकीचं आहे, कारण आरक्षणासंदर्भातील प्रकरण कोर्टात आहे, असं मुंबई न्यायालयाने सुनावणीेवेळी सांगितलं.
मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात वकील विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दरम्यान, मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रकरण कोर्टात असल्याने आंदोलन करणं चुकीचं आहे, कोर्टाची प्रक्रिया होईपर्यंत आंदोलन करू नका, असं न्यायालयानं सांगितलं आहे.
Bombay High Court adjourned hearing on petitions related to #MarathaReservation after State Govt presented a progress report and told Court that it expects a report from Backward Commission by 15th November. Next date of hearing is September 10
— ANI (@ANI) August 7, 2018