IT Raid l महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर छापा टाकून आयटी पथकाने ही कारवाई केली आहे. 72 तासांच्या या कारवाईत आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.
आयकर विभागाने तब्बल 14 कोटींची रोकड केली जप्त :
आयकर विभागाची ही कारवाई तब्बल 72 तास सुरू होती. या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. याशिवाय 8 किलो सोने सापडले आहे. आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता शोधून काढली असून ती जप्त करण्यात आली आहे. छापेमारीत सापडलेली 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले. या कारवाईमुळे फायनान्स व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
भंडारी कुटुंबातील विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे. येथे आयकर विभागाला करचुकवेगिरीची तक्रार आली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांच्या आयकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापेमारी केली.
IT Raid l 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त :
आयकर विभागाचे सुमारे 100 अधिकाऱ्यांचे पथक 25 वाहनांतून नांदेडला पोहोचले होते. या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले. याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत.
नांदेडमधील आयकर अधिकाऱ्यांनी मिळून नांदेड जिल्ह्यात प्रथमच आयकर विभागाने अशी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कारवाई सुरू ठेवली. यावेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. 72 तास चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे.
News Title – IT raid in Nanded
महत्त्वाच्या बातम्या
मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क
राखी सावंतची प्रकृती खालावली; ‘या’ आजाराने त्रस्त
तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन आहात, सावधान! शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा
प्रफुल पटेलांच्या ‘त्या’ कृत्यावरून शिवप्रेमींमध्ये उसळती संतापाची लाट