बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

मुंबई | राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्याला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करणार आहेत, हे पाहवं लागेल असा चिमटा घेतला आहे.

मुख्यमंत्री आता पुरग्रस्त दौऱ्यावर जाणार आहेत, आता त्यांना कितपत काय समजेल? याबाबत शंका आहे, असं संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जे उपाय करणं आवश्यक आहे, ते उपाय ठाकरे सरकारने करावेत, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणीही यावेळी संदीप देशपांडे यांनी केली आहे. ही मागणी करताना ठाकरे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येकी 50 हजारांची मदत करावी, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. कोकणातील महापूरानंतर ठाकरे सरकारने जी मदत केली होती त्यावरून देखील संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारने केलेली तुटपूंजी मदत अजुनही पूरग्रस्तांच्या हातात पडली नाही, संदीप देशपांडे म्हणाले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार खोट बोलत असल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या या आरोपाला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –

‘दोन जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी आम्हाला…’; मनसे-भाजप युतीबाबत नानांचं मोठं वक्तव्य!

“कन्हैया कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा, तो भाजपमध्येही जाऊ शकतो”

“कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रात मंत्रिमंडळात लॉटरी लागण्याची शक्यता, लवकरच घेणार मोदींची भेट”

“सुप्रिया ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?”

आलिया भट्टने केला हिंदू संस्कृतीचा अपमान??? मुंबईत आलियाविरूद्ध तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More