नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 12 धावांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र या सामन्यादरम्यान डीआरएसच्या निर्णयासंदर्भात कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
शेवटच्या सामन्यात नटराजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायचित असल्याचं भारताकडून अपील करण्यात आलं. मात्र भारताने डीआरएस घेण्याच्या अगोदरच ग्राऊंडवरच्या स्क्रीनवर बॉलचा रिप्ले दाखवला. यामुळे भारताला डीआरएसची संधी नाकारली.
दरम्यान या निर्णयावर कोहलीने नाराजी दर्शवलीये. “आम्ही डीआरएस घेण्याबाबत चर्चा करत होतो. 15 सेकंदांचा वेळ होता आणि तेवढ्यात स्क्रीनवर रिप्ले दाखवला. ज्यावेळी आम्ही डीआरएसची मागणी केली त्यावेळी पंचांनी ती नाकारली, असं कोहली म्हणाला.
पंचाना विचारणा केली असता मी काहीच करू शकत नाही, तो टीव्हीचा दोष आहे,असे त्यांनी सांगितलं. ते १५ सेकंद आम्हाला पुढे चांगलेच महागात पडलं, असंही विराटने सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन
महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ
गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया; म्हणाले…
दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार?, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट
रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू