बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता…”; अधिकाऱ्याला धमकवणं पडलं महागात

वर्धा | वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती. तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

“तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता…तुला चप्पलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटतं की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर मी तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार”, अशी धमकी आमदार रणजित कांबळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना दिली होती. त्याचबरोबर तालुका अधिकाऱ्यांनाही आमदारांनी धमकवलं असल्याचं आरोप रणजित कांबळे यांनी दिली आहे.

डॉ. अजय डवले आणि आमदार रणजित कांबळे यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आता अधिकारी डाॅ. डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील डॉ. डवले यांनी केली.

दरम्यान, वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकारी सत्यजित बंडेवार यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

पुणेकरांनो विनाकारण बाहेर पडणार असाल तर सावधान; आजपासून निर्बंध आणखी कडक

मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास पुरूषांनीही अनुभवला, अक्षरशः लोळताना दिसले, पाहा व्हिडीओ

ममता बॅनर्जींची तुलना आहिल्याबाईंसोबत केल्याने भूषणसिंह राजे होळकर आक्रमक, म्हणाले…

‘या’ जिल्ह्यात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट करणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More