बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी त्यांना सर्वकाही दिलं, तरीही त्यांनी राष्ट्रवादी सोडली”

रत्नागिरी |  भाजप आणि शिवसेेनेचा मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेवेळी एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायचे नाही असं ठरवण्यातं आलं होतं. त्यातच आता शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवेश केलेल्या तिघांनी त्यापैकी एकाला पक्षातून बाहेर काढले आहे तर अन्य दोघे पक्षातुन बाहेर पडलेले होते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु, एकमेकांचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करून घ्यायचे नाहीत असं आघाडी करताना ठरलेलं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी एकेकाळी मजबूत होती. गुहागर, खेड आणि रत्नागिरीत आमदार होते. गुहागरचे आमदारांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व काही दिले तरी ते का बाहेर पडले हा प्रश्नचं आहे. भविष्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच जिल्हा संपर्कमंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या पक्ष प्रवेशावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही कुरबूर होणार नाही. तो कालचा प्रवेश होता. आज पुन्हा प्रवेश करून घेतले नाहीत. तीनही पक्षात समन्वय असून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 थोडक्यात बातम्या- 

“चीनवर बोलणारे सर्वज्ञानी संजय राऊत पंढरपूरवर गप्प का?”

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

“कलेक्टर आहे ‘तो’ शिवसेनेचा, सगळ्यांचे पैसे गोळा करतो”

“चौकशी सुरू असताना क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More