बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

पुणे | पुण्यातील झेड ब्रिजवर एका सरईत गुन्हेगाराने तलावारीने केप कापला. यावेळी त्याने आपण तलावारीने केक कापतानाचा एक व्हिडीओ त्याच्या व्हॅट्सअॅप स्टेटसवर ठेवला. मात्र हा स्टेटस ठेवणं त्याला प्रचंड महागात पडलं असून पोलिसांनी त्याचा पाहुणचार केला आहे.

संबंधित सराईत गुन्हेगाराचं नाव रोहन घोलप असं आहे. रोहनने झेड ब्रिजवर आपल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने तलवारीने केक कापतानाचा एक व्हिडीओ त्याच्या स्टेटसवर ठेवला. हा स्टेटस पोलिसांपर्यंत पोहोचताच रोहन अजूनही झेड ब्रिजवर तलवार घेऊन उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून रोहनला ताब्यात घेतलं.

पोलिसांना रेकाॅर्डवरील गुन्हेगार अनिल देशमुख तलवारीसोबत केक कापून कसबा पेठेतील सुर्या हाॅस्पिटलच्या येथे उपस्थित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनिल देशमुख याला अटक केली आहे.

दरम्यान, चाकू, कोयता, तलवार बाळगणे तसेच बनवणाऱ्यांवर विशेष मोहीम रचून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. आता यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

बसच्या छतावर शेकडो लोक, ड्रायव्हरने लावला ब्रेक अन्…, पाहा व्हिडीओ

“ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्राला किती राग आहे, ते दिसतंय”

“मत मागायला याल, तेव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More