इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली | अलीकडे सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतो. कोणाची एखादी कला, कोणाची तरी झालेली फजीती तर कोणाचा तरी वेगळाचं स्वॅग असे अनेक प्रकारचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यादरम्यान एका लहान मुलाचा अतिशय क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहे.
हा व्हिडिओ एका पंजाबी लहान मुलाचा असून यामध्ये एक व्यक्ती त्या लहान मुलाला इंग्रजी शिकवताना दिसत आहे. मात्र इंग्रजी म्हटलं की अनेक गमतेशीर किस्से घडतात. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मुलाला त्याच्या पँन्टवरचे अक्षर वाचायला सांगतो आणि नंतर त्या संपुर्ण शब्दाचा उच्चार करण्यास सांगतो. मुलगा अक्षर निट वाचतो आणि शब्द भलताचं उच्चारतो.
पँटवरचे अक्षर वाचून मुलगा शब्दाचा उच्चार पजामा असा करतो. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केल्यानंतर क्षणातच हजारो लोकांनी या व्हिडिओला रिट्वीट केलं आहे. एवढचं नाही तर या व्हिडिओवर प्रचंड प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील झाला आहे. आयपीएस ऑफिसर अरूण बोथरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच ‘जेव्हा तुम्ही एका पंजाबी मुलाला इंग्रजी शिकवता’ असं या व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ लोकांना अगदी मजेशीरपणे मनाला भावनारा ठरला आहे. एवढचं नाही तर या व्हिडिओमधील म्यूझिकमुळे हा व्हिडिओ आणखीच हास्यस्पद झाला आहे.
Teaching English to a #Punjabi kid 😈 pic.twitter.com/yWhRxftFEr
— Arun Bothra (@arunbothra) March 13, 2021
थोडक्यात बातम्या-
फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका
खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”
“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा
इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ
Comments are closed.