बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिमुकल्याचे प्राण वाचवणं होतं अशक्य; 16 कोटीच्या इंजेक्शनसाठी विरूष्कासह इतर कलाकारांनीही घेतला पुढाकार

नवी दिल्ली | कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहे. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही पुढे आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली हे दाम्पत्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशवासियांना भरभरून मदत करत आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे निधीही उभा केला होता.

यासोबतच विरूष्काने अयांश गुप्ता नावाच्या एका छोट्या मुलाचे प्राण वाचवल्याचंही समोर आलं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मिळ विकाराशी तो लढत आहे. त्याच्या उपचारांसाठी झोल्गेन्स्मा नावाच्या औषधाची गरज होती. हे औषध जगातल्या अत्यंत महागड्या औषधांपैकी एक असून, त्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. एका औषधासाठी एवढे पैसे मोजणं श्रीमंतांनाही सहज शक्य नाही, तेव्हा सर्वसामान्य माणसांकडे एवढे पैसे असणं शक्यच नाही. पण अयांशच्या आईवडिलांनी हार मानली नाही. त्यांनी अयांशचे प्राण वाचवण्यासाठी AyaanshFightsSMA नावाचं एक ट्विटर अकाउंट सुरू केलं. ऑनलाइन फंडरेझर मोहिमही सुरू केल्या. या सगळ्या खटाटोपाचं फळ मिळालं आहे. त्या चिमुकल्यासाठी 16 कोटी रुपये उभे राहिले आहेत. असं अयांशच्या आई-वडिलांनी ट्विटर अकाउंटवर हे जाहीर केलं आहे.

‘आम्ही चाहते म्हणून कायमच तुमच्यावर प्रेम केलं पण अयांशसाठी आणि या मोहिमेसाठी तुम्ही जे काही केलं आहे, ते आमच्या अपेक्षेपलीकडचं आहे. खूप आभार. आयुष्याची ही लढाई षट्कार मारून जिंकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली. आम्ही कायमच तुमच्या ऋणात राहू,’ अशा शब्दांत रूपल आणि योगेश गुप्ता यांनी विरूष्काचे आभार मानले आहेत. त्यासोबतच, राजकुमार राव, जावेद जाफरी, इम्रान हाश्मी, दिया मिर्झा, अर्जून कपूर, सारा अली खान, नकुल मेहता, ऋत्विक धनजानी हे कलाकारही या मोहिमेत सहभागी झाल्याचं ट्विटर अकाउंटवरच्या ट्विट्सवरून दिसत आहे.

दरम्यान, ‘अयांशचे प्राण वाचवण्यासाठी सुरू केलेला हा अवघड प्रवास इतक्या सुरळीतपणे पार पडेल, असं वाटलं नव्हतं. झोल्गेन्स्मा औषधासाठी 16 कोटी रुपये उभे झाले आहेत, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप आभार. हा तुमचा विजय आहे. आपण सर्वांनी हे करून दाखवलं’, अशी भावनिक पोस्ट अयांशच्या आई-वडिलांनी ट्विटरवरून शेअर केली आहे.

 

थोडक्यात बातम्या –

‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More