बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार 4 वेळी मुख्यमंत्री होते पण…’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं अलिकडील मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय हे वक्तव्य खूप गाजलं होतं. या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो, परंतु माझ्या लक्षात हे कधीच राहिलं नव्हतं. ही आमची कमतरता आहे, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फरक हा आहे की, मी चाळीस वर्षानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठे नेते आहेत. परंतु ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्षे असं मुख्यमंत्रिपदावर राहावं लागलं. परंतु एका गोष्टीचं मला समाधान आहे, की मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे, हे पाहून संपूर्ण महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे, हीच कामाची पावती आहे, असं फडणवीस म्हणाले

पाच वर्ष सत्तेेत असल्याचं स्मरण राहणं, हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे, हे यातून दिसतं. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत, याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे, हे यातून दिसून येतंं, सत्ता येते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांवर राज्यातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे चूकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की, राज्यातील जनता अजूनही मुख्यमंत्री असल्याप्रमाणेच अपेक्षा ठेवत आहे, असं विरोधी पक्षाने केलेल्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी उत्तर दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला का जात नाहीत?; समोर आलं ‘हे’ कारण

“तर नेटफ्लिक्सकडून अजित पवारांना 2-3 कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल”

आला रे आला ‘लॉर्ड शार्दुल’ आला! ‘या’ खेळाडूच्या बदल्यात विश्वचषक संघात शार्दुलची एन्ट्री

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More