वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं तेव्हाच सांगितलं होतं की…- संजय राऊत
मुंबई | मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अजून एक प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी हे भाष्य केलं आहे.
दरम्यान, काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार अजिबात नाही. आपण राजकारणात असू, तर टीका सकारात्मकपणे घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे टिकेचे घाव सोसूनच या शिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबद्दल चार शब्द लिहिले, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?-नारायण राणे
रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य
पुणे हादरलं! वाढदिवसाच्या बहाण्याने 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार
ठरलं तर! पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.