बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती”

मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलंच तापलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9शी संवाद साधताना प्रीतम मुंडे यांनी म्हटलं की, अद्याप ओबीसी आरक्षण रद्द झालेलं नाही. त्यांमुळे सारखं आरक्षण रद्द झालं हे म्हणणं घाईचं ठरेल. आता हे स्थगित करण्यात आलेलं आहे.

पुढे प्रीतम मुंडे यांनी म्हटलं की, इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती. मात्र त्यांनी ते त्यांच्याकडून झालं नाही. ते विरोधी आहेत म्हणून बोलत नाही तर तो सत्तेत होते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा होती.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाची अजून एक सुनावणी बाकी आहे. त्यामुळे स्थगिती हटवून पुन्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे, असंही मुंडे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

“…त्यामुळे शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतीये”

ज्वालामुखीचा उद्रेक होताच जीव मुठीत घेऊन पळत सुटले लोक; धडकी भरवणारा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

‘शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात’; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More