बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयटी क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 35 हजार जणांना नोकर्‍या देणार!

नवी दिल्ली | आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत5,195 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. तसेच मागील तिमाहीत कंपनीला 5,080 कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर कंपनीने एप्रिल-जून 2020 मध्ये 4,233 कोटी नफा कमावला.

त्रैमासिक निकाल जाहीर करताना इन्फोसिसने सांगितले की, ते आर्थिक वर्ष 22 दरम्यान 35,000 नवीन लोकांची भरती करणार आहेत. यात कंपनी फ्रेशर्सना संधी देईल. त्याचबरोबर, वेतनवाढ ही कंपनी जुलैपासून लागू करेल.

इन्फोसिसने जाहीर केलेल्या निकालांनुसार, कंपनीच्या उत्पन्नाची (QoQ) जून तिमाहीत 26,310 कोटी रुपयांवरून 27,900 कोटी रुपये एवढी वाढ झालीय. पहिल्या तिमाहीत कंपनीला 260 कोटी डॉलर्सचे ऑर्डर प्राप्त झालेत. इन्फोसिसने FY22 चे कार्यकारी मार्जिन गायडन्स 22-24 टक्के ठेवलेय. पहिल्या तिमाहीत वित्तीय सेवांमधून कंपनीचे उत्पन्न 9,220 कोटी रुपये होते. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्राकडून कंपनीला 2700 कोटी रुपये मिळाले.

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख सांगतात की, कर्मचारी आणि ग्राहकांच्या आधारे जून 2021 च्या तिमाहीत आपली वाढ 10 वर्षांत सर्वाधिक होती. स्थिर चलनावर ही वाढ वार्षिक आधारावर 16.9 टक्के आणि तिमाही आधारावर 4.8 टक्के नोंदविण्यात आली. हे पाहता महसुली विकास दर 14 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढवलाय.

थोडक्यात बातम्या- 

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More