बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, पाच वर्ष होतील पण…”

पुणे |  गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं सांगत आहे. तीन पक्षांचं सरकार अंतर्गत विरोधामुळे पडेल, असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी येत्या मार्चमध्ये भाजपचं सरकार स्थापन होणार, असं म्हटलं होतं. त्यावरून आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘राज्यात सरकारने चांगलं काम केलं आहे. मी या कामावर समाधानी आहे. आता राणेंनी मार्चची डेडलाईन दिली आहे. परंतु, त्यांचा मार्च कुठला तो शोधावा लागेल’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच पुढचा त्याच्या पुढचा मार्च जाईल. पाच वर्ष होतील, पण महाविकास आघाडी मजबूत राहिलं, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1948 साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. अनेक दिवसांपासून इथे शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. यावरून या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या वक्तव्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील टीका केली होती. गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या तारखा देत आहेत. मात्र, नारायण राणे यांनी मार्च ही जरा जास्तच मुदत दिली. त्याबद्दल नारायण राणे यांचे आभार, असा टोला जयंत पाटील यांनी नारायण राणेंना लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More