बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, चिंगारीचा वणवा पेटण्याआधी जागे व्हा”

मुंबई | राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण,  कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. त्यानंतर येत्या 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत दिसत आहे. त्याआधी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणावरून आंदोलने झाली आहेत, लोक रस्त्यावर उतरले. सरकार मात्र मलिदा खाण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, मराठा समाजाच्या चिंगारीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही. वणवा पेटण्याआधी मुख्यमंत्र्यांनी जागे व्हा, असा इशारा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास सुरू आहे. संघर्ष नको संवाद साधा, असे सांगणाऱ्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही संवाद साधला जात नसून, त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काहीही देणेघेणे नाही. भाजप, केंद्र सरकार, फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा या अधिवेशनात मराठा समजाला न्याय देण्यासाठी प्रत्यक्षात एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, असंही दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं होतं. यावर प्रवीण दरकेरांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

‘या’ तारखेपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू, लवकरच निर्णय जाहीर करणार- उदय सामंत 

‘लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी’; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More