शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”
मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांंच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण राष्ट्रवादीच्या अंगलट येत असल्याचं दिसताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी ज्युलिओ रिबेरो सारख्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला ऑफर आली तरी हे काम करणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्युलिओ रिबेरो यांनी दिली आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीला मी स्पर्श करू इच्छित नाही. ही अत्यंत अवघड परिस्थिती असून याचा शेवट कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्यावर राजकारण्यांनीच तोडगा काढून परिस्थिती पुर्ववत करणं योग्य राहील, असं ज्युलिओ रिबेरो म्हणाले.
माझं वय 92 वर्ष आहे. या चौकशीसाठी मी समर्थ नाही. समर्थ असलो तरी या चौकशीला मी नकार दिला असता, असं रिबेरो यांनी म्हटलं आहे. जर आयपीएस अधिकाऱ्यांची नावं जर खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत, असंही रिबेरो यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
दरम्यान, ज्युलिओ रिबेरो हे कडक शिस्तीचे आणि नाॅन करप्ट अधिकारी म्हणून आळखले जातात. आजही पोलीस दलात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळे अशाच एका अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त केलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी
“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”
शरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण?
“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”
“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.