संतापलेल्या हत्तीचा फोटो काढणं बेतलं असतं जिवावर, पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली | सोशल मीडीयावर आलीकडे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाची कला, कधी कोणाचा प्राण्यासोबतचा स्टंट, असे बरेचं व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यादरम्यान सध्या एका चिडलेल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दोघेजण जिपमधून जंगलची सैर करताना एका हत्तीच्या मागे त्याचे फोटो काढत जाताना दिसतात. हत्ती शांतपणे चालत असताना अचानक संतापून जीपच्या मागे धाव घेतो. त्यांनंतर हत्तीपासून बचाव करण्यासाठी ते त्यांची गाडी रिव्हर्स घेतात आणि हत्तीला घाबरवण्यासाठी गाडीचा हाॅर्न वाजवतात.
गाडीचा हाॅर्न ऐकून सुद्धा हत्ती घाबरत नाही. थोडा वेळ त्यांचा पाठलाग केल्यानंतर हत्तीचा राग अचानक शांत होतो आणि तो दुसऱ्या वाटेने निघून जातो. जंगली प्राण्यांच्या घरात घुसून त्यांनाच राग आणून देणं हे माणसाला खर तर गंमत वाटते. मात्र हीच गंमत कधी जिवावर बेतेल सांगता येत नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन शेअर केला असून अनेकांनी या व्हिडीओवर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Everyday it will not be this lucky…
Safe distance is a must in jungle safaris.
Shared by Colleague Surender Mehra. pic.twitter.com/zSs0CzPmHm— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 23, 2021
थोडक्यात बातम्या-
मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला
“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.