बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे कर्तव्य आहे, ते पार पडलं पाहिजे”

सांगली | महापूरामुळे चिपळूणमधील कित्येक लोक रस्त्यावर आले आहेत. अनेकांच्या आयुष्यभराची कमाई पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. नुकसानग्रस्त भागातील लोकांचं दु:ख असह्य आहे. चिपळूणची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या एका महिलेला दमदाटी केली. अशातच आता याप्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगली येथे आज ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकप्रतिनिधींनी कुठेही गेलं तरी जनता काय म्हणतेय हे ऐकायचं असतं. त्यावेळी चिपळूनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती हे मला माहित नाही. परंतु, मी भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही बरिच वर्ष एकत्र काम केलं आहे. परंतु आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेेले तरी जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे कर्तव्य आहे, ते पार पाडलं पाहिजे, असंं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज अजित पवार गेले होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन त्यांनी पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, चिपळूण बाजारपेठेत घडलेल्या त्या प्रकारावरुन विरोधकांनी जाधव यांना धारेवर धरलं असतानाच संबंधित महिलेने समोर येत यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाधव यांनी अरेरावी केली नाही. त्यांचा आवाजच राउडी राठोडसारखा आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, पोलिसांना ऑफिसमध्ये सापडली धक्कादायक गोष्ट!

‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना दिला सल्ला

सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन

आईच्या अंगावर कुत्रा भुंकला, तरुणीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना!

जाधवांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा आहे; चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More