बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोलकाता | तौक्ते चक्रिवादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर थैमान घातलं होतं. तौक्ते चक्रिवादळामुळे गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला मोठा फटका बसला होता. लाखो लोकांना या चक्रिवादळाचा फटका बसला. तौक्ते चक्रिवादळाचं संकट टळलं नाही तोपर्यंतच आता यास चक्रिवादळाचं संकट समोर येऊन उभारलं आहे.

यास चक्रीवादळ आता पुढच्या काही तासांतच पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये वादळाची पूर्वसूचना देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह या राज्यांमध्ये पाऊसही सुरु झाला आहे. 11-12 च्या सुमारास हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वादळाआधी ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

 

यास वादळ ओडिशापासून धामरा बंदरावर 40 किमी अंतरापासून आणि बालासोरपासून दक्षिण पूर्व भागात 90 किमी अंतरावर होते. दुपारी 2 च्या नंतर हे चक्रीवादळ ओडिशापासून पुढे जाणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या दरम्यान हवेचा वेग हा 130 ते 140 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी वादळामुळे पावसाला सुरुवात झाली असून केंद्रपारा व जगतसिंगपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ताशी 80 कि.मी वेगाने वारे वाहू लागले आहेत.त्यानंतर चक्रीवादळ पारादीप आणि सागर द्वीप दरम्यान, उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्याता आहे.

 

थोडक्यात बातम्या-

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More