ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी
अहमदाबाद | एखादा व्यक्ती जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीला भेट म्हणून काय देईल याचा काहीही नेम नाही. सूरतमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने त्याच्या दोन महिन्याच्या बाळाला भेट म्हणून चक्क चंद्रावर जमीन विकत घेऊन दिली आहे. विजय कथेरिया असे त्या व्यावसायिक नाव आहे. विशेष म्हणजे यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारे ते पहिले व्यावसायिक ठरले आहेत.
विजय कथेरिया हे सूरतमधील व्यावसायिक आहेत. विजय हे काच खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक आहेत. ते मूळचे सौराष्ट्रमधील असून ते सध्या सूरतच्या सरथाणा या ठिकाणी राहतात. दोन महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नित्या कथेरिया, असे त्या बाळाचे नाव ठेवण्यात आले. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला काय तरी विशेष भेट द्यावी, असा विचार विजय कथेरिया यांच्या मनात आला. पण त्यांना ठराविक गिफ्ट न देता काहीतरी खास आणि वेगळं गिफ्ट त्या बाळाला द्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी बाळाच्या नावे चंद्रावर जमीन घेऊन देण्याचा विचार केला.
या निर्णयानुसार विजय यांनी यातील सर्व कायदेशीर गोष्टींची माहिती काढली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूयॉर्क इंटरनॅशनल लूनार लँड रजिस्ट्री’ कंपनीला 13 मार्चला ईमेल पाठवत अर्ज केला. त्यात त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी करायची असल्याचे सांगितले. यानंतर कंपनीने त्यांच्या अर्जावर सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत जमीन खरेदी करण्यास मान्यता दिली. तसेच त्यासंबंधित सर्व कागदपत्रं त्यांना पाठविली.
दरम्यान, विजय कथेरिया हे चंद्रावर जमीन खरेदी करणारे पहिले व्यावसायिक ठरले आहेत. तर त्यांचे हे बाळ कदाचित चंद्रावर जमीन असणारं सर्वाधिक लहान वयाची व्यक्ती ठरण्याची शक्यता असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.
थोडक्यात बातम्या –
ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस
मी लस घेतली पण फोटो काढून नौटंकी करायला मला आवडत नाही- अजित पवार
‘नवनीत राणा यांनी वेळीच आवाज उठवला असता तर…’; महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून रूपाली चाकणकर आक्रमक
“बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात कुणाचा फायदा होता?”
आशियातला सगळ्यात मोठा मॉल, मात्र सुरुच झाला नाही; आग लागलेल्या मॉलबद्दल आणखी धक्कादायक गोष्टी समोर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.