‘ती अजिबात प्रायव्हसी…’, पहिल्या पतीचा राखीबद्दल मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. नुकतंच तिनं बाॅयफ्रेंड आदिल खानसोबत(Adil Khan) लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु आदिल या लग्नाला कबुली द्यायला तयार नव्हता. राखीनं गोंधळ घातल्यानंतर अखेर आदिलनं लग्नाची कबुली दिली.

त्यातच राखीचा पहिला पती रितेशनं राखीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. एका वाहिनीशी संवाद साधतााना रितेश म्हणाला की, राखी जे काही करते ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी करते. राखीकडून ज्या काही बातम्या येतात तो फक्त मसाला आहे, बाकी काही नाही, असंही तो म्हणाला.

राखी कधी ख्रिश्चन धर्म स्विकारते तर कधी मुस्लिम बनते. तुम्ही कधी तिला हिंदू सण साजरे करताना पाहिलं नसेल, असंही रितेश म्हणाला आहे. रितेशच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

रितेश राखीच्या स्वभावाबद्दल बोलताना म्हणाला की, राखी एक चांगली पत्नी बनू शकते की नाही यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. पण राखीनं जरा समजूतदार आणि मॅच्युअर व्हायला हवं.

नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रायव्हसी, विश्वास आणि वचबद्धता हवी. पण राखी यातलं काहीच करत नाही. ती प्रत्येक गोष्टी सांगते. माध्यमांसमोरही ती सहानुभूती मिळवण्यासाठी बोलते. पुढच्या व्यक्तीला ती गोष्ट आवडते की नाही याचा राखी विचार करत नाही, असंही रितेश यावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-