बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

मुंबई | सेलिब्रिटी मंडळींवर त्यांचे चाहते जीव ओवाळून टाकतात. चाहत्यांच या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. चाहत्यांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी खूप कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.

सेलिब्रिटींची लोकप्रियता इतकी असते की, कधी तो अभिनयाव्यतिरिक्त दुसरे काही काम करताना दिसलाच तर त्याची लगेचेच चर्चा होते. नुकताच एक्शन हिरो जॉन अब्राहम सिनेमाची तिकीटं विकताना दिसला. सध्या त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून जॉन इथे काय करतोय असा विचार तुम्ही करत असाल, सोशल मीडियावर जॉनच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना जॉनने मात्र वेगळी ट्रिक वापरली आहे. त्याने थेट फॅन्सना तिकीटं देत सिनेमाचे प्रमोशन केले आहे. ‘मुंबई सागा’ सिनेमा सुपरहिट व्हावा यासाठी आता निर्मात्यांबरोबर कलाकारांनीदेखील कंबर कसली आहे.

दरम्यान, माझ्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये मी अनेक मोठ्या बॅनर्ससोबत काम केले. तसेच कमी बजेटचे सिनेमेही केले. मल्टीस्टार चित्रपटही स्वीकारले. मी जे काही कमावतो, त्यात समाधानी आहे. माझ्यासाठी पैसा हा फार मोठा विषय नाही. मी कामासाठी मोठ्या डायरेक्टरच्या दरवाज्याबाहेर उभा होऊ शकत नाही. हा अहंकार नाही तर आत्मसन्मनाचा विषय आहे, असेही जॉन अब्राहम म्हणाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

थोडक्यात बातम्या –

कोरोना झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारेे असणार विशेष परीक्षेचं आयोजन, जाणून घ्या!

दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…

…म्हणून महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी न्यायालयात मागितली परवानगी!

‘ती’ 45 मिनटं आमच्यासाठी खूप मोठी…; व्हाॅटस अॅपने मानले यूझर्सचे आभार

धक्कादायक! महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी घेत संपवलं आयुष्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More