बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हायरल व्हिडीओमुळं प्रसिद्ध झालेल्या ‘बाबा का ढाबा’मध्ये पुन्हा शुकशुकाट?, रेस्टॉरंट बंद करण्याची आली वेळ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’ चांगलाच चर्चेत आला होता. बाबा का ढाबा चालवणाऱ्या 81 वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी यांचं नशीब एक व्हायरल व्हिडीओमुळे एकदम पलटून गेलं होतं. लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं. मात्र, आता हे रेस्टॉरंट त्यांना बंद करावं लागलं आहे.

बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट उघडलं होतं. बाबाने या नवीन रेस्टॉरंटचा श्री गणेशा दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये केला होता. याबाबत मात्र, आता त्यांच्यावर व्यवसायाला पुन्हा एकदा लॉक डाउन फटका बसला आहे. पुन्हा बाबा का ढाबा रेस्टॉरंट बंद करून जुन्याच जागेवर आले आहेत. पुन्हा एकदा त्याचे रेस्टॉरंट बंद पडल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे.

दिल्लीतील कोरोनामुळं त्यांचा जुना ढाबा 17 दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळं विक्रीवर परिणाम झाला आहे. पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती आली आहे. लॉकडाऊनमुळं ढाब्यावर होत असलेल्या गर्दी कमी झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी आमची रोजची 3500 रुपयांचा व्यवसाय होत होता आता तो 1000 रुपयांवर आला आहे. माझ्या कुटुंबाच्या जगण्यासाठी हे पुरेसे नाही असं कांता प्रसाद यांनी सांगितलं.

दरम्यान, मागील वर्षी बाबा का ढाबाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळाली, यातून त्यांनी नवं रेस्टॉरंट सुरू केलं. आपल्या घराचं काम केलं आणि जुनं कर्जही फेडलं. स्वतःसाठी आणि मुलांसाठी स्मार्टफोन विकत घेतले. मात्र, आता पुन्हा त्यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. त्यांच्या ढाब्यावर सध्या भात, डाळ आणि दोन प्रकारच्या भाज्या मिळतात.

थोडक्यात बातम्या – 

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More