बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

मुंबई | जवळ जवळ महिना होत आला पण एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. अनेक मागण्या लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी (Mahamandal Employees) आंदोलन पुकारलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नसला तरी काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या असल्या तरी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

वेतनवाढीच्या मागणीनंतर आझाद मैदानावरील (Azad Maidan Mumbai) संप तात्पुरता मागे घेत असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतल्यावर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनाविषयीचा निर्णय आता कामगारांनीच घ्यावा, असं वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलं आहे. हे आंदोलन कामगारांनी उभं केलं त्यामुळे याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा, असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं आहे. आज यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन आहे त्यामुळे यादिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली. बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की चालूच ठेवायचे हे कामगारांनी ठरवावे. आंदोलन चालू ठेवले तरी आमचा त्यांना पाठिंबा राहिल पण हा निर्णय एसटी कामगारांनी घ्यावा, असं सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले. सरकारने पगारवाढ करून तात्पुरता दिलासा दिला असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली’, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

मोठी बातमी! संपत्ती जप्त होण्याआधीच फरार परमबीर सिंह मुंबईत दाखल

‘दोन दिवसांत कामावर रुजू न झाल्यास…’; प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More