Top News देश

महाराष्ट्रातलं सरकार स्वार्थासाठी स्थापन झालंय, कमाई करणं हाच त्यांचा उद्देश, भाजपाध्यक्षांचा घणाघात

मुंबई |   महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार स्वार्थासाठी स्थापन झालंय. कोरोनाच्या संकटात देखील भ्रष्टाचार सुरू असल्याचं पक्षातील नेत्यांकडून मला कळालं आहे. एवढ्या मोठ्या जागतिक आरोग्य संकटात देखील कमाई करणं त्यांचा उद्देश आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

भाजपची राज्य कार्यकारिणी काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. याच कार्यकारिणीसोबत नड्डा यांनी व्हर्च्युअली संवाद साधला. नवी दिल्लीमधून ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.

कोरोना संकटात देखील राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहेत. त्यांचा हा भ्रष्टाचार उघडा करून सरकारला उघडं पाडा. येणाऱ्या सर्व निवडणुकीत स्वबळावर जिंकून येण्यासाठी परिश्रम करा तसंच सरकारविरोधातला लढा अधिक तीव्र करा, असे आदेश जे. पी. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तसंच राज्यातील भाजप नेत्यांना दिले आहेत.

दुसरीकडे, सरकार पाडून दाखवा या मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. तसंच सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाच रस नाही. तुमच्या कर्मानेच तुमचं सरकार पडेल, असं प्रत्युत्तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या”

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य सांगणाऱ्या या गाण्याचे गृहमंत्र्यांकडून अनावरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या