बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते ट्रेंड चालू असतात. ट्रेंड आला की नेटकरी त्या ट्रेंडला फॉलो करतातच. सध्या अशाच प्रकारे सोशल माध्यमांवर ‘पावरी’ व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र आता नेटकरीच नाही तर राजकीय पक्षही या ट्रेंडचा वापर राजकारणामध्ये वापरताना दिसत आहेच. अशातच या नव्या ट्रेंडची झलक पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये दिसली आहे.

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सभेला संबोधित करताना या ट्रेंडचा वापर केल्याचं दिसत आहे. जे. पी. नड्डा पश्चिम बंगालमधील परिवर्तनाबद्दल बोलत असताना या मीम्सचा वापर केला. त्यांचा हा व्हिडीओ एडिट करून जो मुळ व्हिडीओ आहे तो सुरूवातीला टाकला आहे.

जे. पी. नड्डा हे 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी झालेल्या रॅलीमध्ये पोडियममधून म्हणाले की, ही बंगालची प्रबुद्ध जनता आहे, येथे आपण सर्व आहोत आणि बंगालमध्ये परिवर्तनाची तयारी सुरू आहे.

दरम्यान, मुळचा पाकिस्‍तानचा असलेला ‘पावरी’ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्य व्हिडीओ आहे त्यामध्ये पाकिस्तानमधील मुलगी आपल्या मैत्रिणींसह पार्टी करत आहेत. तेव्हा ती व्हिडीओ चालू करते आणि बोलते की, ये हमारी  कार है, और ए हम है और हमारी पावरी चल रही है. संबंधित तरूणी पार्टीऐवजी पावरी असं म्हणते.  याच व्हिडीओवर भारतातील अभिनेते, खेळाडू आणि तरूण-तरूणी मीम्स करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पूजाच्या आईचा अरूण राठोडबाबत धक्कादायत खुलासा; म्हणाल्या…

‘थंडीने गॅसचा दर वाढले’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

बसा बोंबलत! ‘कंडोम’च्या नादात घालवले तीन लाख रुपये

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More