धोनीच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात…

रांची | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महेंद्रसिंग धोनीच्या भाजप प्रवेशाविषयी भाष्य केलं आहे. धोनी जर भाजपमध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी दिली आहे.

झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नड्डांनी राज्याचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते.

विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीच्या निवृत्तीबाबत बऱ्याच खुमासदार चर्चा रंगल्या. धोनी निवृत्तीनंतर राजकारणात सक्रीय होणार असल्याच्याही चर्चा आहेत.

दरम्यान, भाजप नेते संजय पासवान यांनी याआधीच धोनीला भाजपमध्ये घ्यायला उत्सुक असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-आजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…

-काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास