देश

“कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार”

नवी दिल्ली | कोरोना संपल्यावर केंद्र सरकारकडून लगेचच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलंय.

सर्वच ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे आता सरकारकडून CAA च्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच CAA कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल, असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय.  ते पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘फोडा आणि राज्य करा’, या धोरणाचा अवलंब करत आहेत. तसेच ममता यांच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील नागरिक मोदी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहिल्याचा आरोप नड्डा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

‘देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या